...

श्री. रविंद्र बिनवडे, भाप्रसे,
आयुक्त, कृषी, महाराष्ट्र राज्य

शासकीय अधिकारी कर्मचा-यांचे सेवा तपशिल व्यवस्थापन आज्ञावली

विभागीय कृषि सहसंचालक पुणे विभाग पुणे या कार्यालयासाठी प्रशासन गतिमान व पारदर्शक करण्यासाठी विकसीत केलेली विशेष प्रणाली-

या प्रणालीद्वारा राज्य विभाग उपविभाग व तालुका स्तरावरुन अधिकारी व सर्व र्संवर्गातील कर्मचारी याचे संपूर्ण सेवा अभिलेख/माहिती अध्यावत करणे शक्य होते तेसेस सेवा अभिलेख अद्ययावतीकरण व संगणकीकरण तसेच सेवा पुस्तक, समुपदेशनाद्वारे बदली व रोस्टर व्यवस्थापन सुलभ होते.

या प्रणालीमध्ये कार्यालयांतर्गत आवश्यक माहितीचे अदानप्रदान जलद व सहजरित्या करता येते.

या माहिती सोबत लागणारे गरजेचे कागदपत्र उदा. कर्मचारी याचे फोटो व सही, नियुक्ती / पदोन्नतीचा आदेश, जात वैधता प्रमाणपत्र , शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असे इतर विविध कागदपत्रे अपलोड करून संबंधित माहितीशी लिंक करता येते.

ही सर्व माहिती संकलित करून कार्यालयात लागणारे विविध मासिक अहवाल, सेवा जेष्ठता यादी (बदल्या / पदोन्नती करीता), रोस्टर व इतर अनेक आवश्यक अहवाल या प्रणालीद्वारे उत्पन्न करता येते.

या प्रणालीद्वारे कर्मचारी त्याच्या नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी प्राप्त केल्यानंतर त्याची माहिती पाहू शकतात.

या प्रणालीचा वापर करून जिल्हा / तालुका पातळीवरील कार्यालयाकडून कोणतीही आवश्यक माहिती जमा करणे सोपे होते.